..तुझ्याशी "खूप खूप " ..भांडते ना ..
.....खर सांगू ......
....माझी मीच अस्वस्थ होत असते ..!
..तुझ्याशी "तुटक" बोलून तुला नाराज करताना ...
..माझी मीच खरेतर "..नाराज" होत असते ..!
.उगाचच मग मनाशी "चीडचीड "..करत रहाते ..
अकारण .."घडी घडी "तुझीच ..वाट पहात बसते ..!
..तुझा ...एखादा .."मेसेज" ..येईल ....
..तुझा ..एखादा "फोन' ..येईल ....
..नाहीतर मग तू स्वताच कदाचित येशील .....!
..मग मी आपणहून तुझ्या जवळ ..येईन ...
..तुझ्या गळ्यात हात टाकेन ...आणी म्हणेन ..
..."..ए ..माफ कर ना मला .."
.तू पण नेहेमीप्रमाणेच ..मला जवळ घेशील ..
..एक टप्पल ..मारशील ..माझ्या डोक्यात ...
आणी ,,..म्हणशील ,..
..चल ..वेडाबाई ..कुठली !!!
.........................वृषाली ****