तुझ्याशी नकळत झालेला संवाद खूप हवासा वाटतो
तुझ्या विचारांवर झालेलं माझं प्रेम खूप जपावस वाटतं
अनोळखी म्हणून आलेला तु माझ्या आयुष्यात
तुला माझं सर्व प्रेम द्यावसं वाटतं
ज्या भेटीला काळाची मर्यादा आहे
मला ती बंधन तोडावीशी वाटतात
तू आहेस माझ्यासोबत या छोट्या आशेवर
मला आपली स्वप्न बघाविशी वाटतात
बंधनं नसावीत या नात्यात
जर ती असलीच तर ती बंधन सोडून
तुझ्यासाठी तुझ्याकडे यावसं वाटतं