मनसोक्त जगणं म्हणजे काय असावं?
कशाचाही विचार न करता जगणं म्हणजेच जगणं असाव
कधी शांतता प्रिय वाटावी
कधी एकांत ही प्रिय वाटावा
कदाचित हेच तर जगणं नसावं?
मनसोक्त जगणं म्हणजे काय असावं?
कसलीही भीती नसावी
कसलही ओझ नसावं
कदाचित हेच तर जगणं नसावं?
मनसोक्त जगणं म्हणजे काय असावं?
विचारांमध्ये बुडालेल्या मनाला
थोडासा धीर द्यावा
कामाच्या व्यापात बुडालेल्या शरीराला
थोडासा आराम द्यावा
कदाचित हेच तर जगणं नसावं?
मनसोक्त जगणं म्हणजे काय असावं?