मी तयार होते कपाळा वर मुंडावळ्या बांधायला
पण मला फक्त तूझी चादर व्हायचे नव्हते...
मी तयार होते माझ्या नावामागे तुझे नाव लावायला
पण मला माझे बाबांचे आडनाव ही जोडायचे होते...
मी तयार होते तुझ्या आईला आई म्हणायला
पण मला माझ्या अस्तित्वाची राख होऊ द्यायचे होते...
मी तयार होते हातावर तुझे नाव लपवून पुर्ण तः तुझे व्हायला
पण मला त्या आधी माझ्या तळ हाताच्या रेखा तुला दाखवायचे होते...
हां मी तयार होते तुझ्या साठी पूर्णत: स्वतःला हरवायला
पण त्या आधी मला तुझ्या हातची एकदा चहा प्यायचे होते...
©shwetsawali
insta id: @poet_shwet.sawali