****** माझ्य़ा..जोडीदारा...******
साथ संगत तुझी न माझी.अगदी मनासारखी..!!!
कीती तरी.जुनी'..पण अजुन..नव्यासारखी"..!!
माझे बोलणे.जणु.धबधबा".फेसाळणारा आणी न थांबणारा ..
तुझा..स्वभाव,,"मितभाषी"..थोडक्यात सारेच...सांगणारा..
माझी सदा "चुळबुळ"..इकडुन तिकडे...तिकडुन ईकडे....
तुझी नजर हलत नाही..माझ्यावरुन.."इकडे..किंवा तिकडे"..!
मी रमते..कवितांच्या..जगात..
"शब्दांच्या मृगजळात"..!
तु म्हणतोस,"तुझ्याशिवाय..कुठली कविता..या व्यवहारी जगात"..!!
मी मनाची "निर्मळ"..पण हट्टी,,जराशी...
तु समजुतदार..आणी साधा..तुझी" तुलनाच "नाही कुणाशी!!
माझा..कोणताच "विचार"..तुझ्यावाचुन होत नाही पुर्ण..
माझ्या शिवाय..तर तुझी हर एक गोष्ट..रहाते."अपुर्ण"..!!
माझे "स्वातंत्र्य"..माझे" विचार"..याची..तुलाच असते "कदर"..!
माझे आयुष्य..जणु,,एक "पुस्तक"..तुझ्यापुढेच असते सादर....!
माझा "मान"..माझा' अपमान"माझा "छंद"..माझ्या "आवडी"...
जातोस...तु मिसळुन सहजच सगळ्यात...!
माझे तर सारे "जगच"..एकवटलेले असते.."तुझ्यात"".आणी "तुझ्यात"!!
माझी "नाराजी"..माझी "बेचैनी"..माझे "डोळेच"सांगत असतात तुला..!
व्यवहारात जगताना तुला होणारा त्रास..लगेच जाणवतो.."मला"
..खुप आल्या.."अडचणी"..बरेच कष्ट काढले...
तुझे "आश्वासक" हात होते "हातात"..मग काहीच नाही वाटले..!!!
जोड्या..जमतात म्हणे" स्वर्गात.."....
पण काहीच रहातात.. पृथ्वीवर."सुखात"....
वृषाली