🥕🥕गाजराचे लोणचे
सध्या सिझनमध्ये लाल भडक गोड छान गाजरे मिळतात
गाजर हलवा गाजर पराठा असे अनेक पदार्थ केले जातात
पराठे,हलवा करताना गाजर खिसले की शेंड्याचा भाग खिसता येत नाहीं
एक दीड इंच हा शेंडा असाच राहतो
अशा वेळी त्याचे तुकडे करून हे लोणचे करून बघा
🥕साहित्य
गाजराच्या शेंड्याचे बारीक चिरलेले तुकडे अर्धा वाटी
तिखट एक चमचा
मीठ चवीप्रमाणे
एक लिंबू
अर्धा चमचा मेथ्या पावडर
एक चमचा मोहरी पावडर
फोडणीचे साहित्य
🥕कृती
प्रथम मोहरी हिंग घालुन फोडणी करून घेणे
फोडणीत एक चमचा तिखट आणि अर्धा चमचा
मेथ्या पावडर घालुन गॅस बंद करावा
🥕आता चिरलेल्या गाजराच्या तुकड्यात
चवीप्रमाणे मीठ आणि मोहरी पावडर घालावी
🥕फोडणी गार झाली की या मिश्रणात घालून वरून एक लिंबाचा रस घालून
चांगले एक जीव करून घ्यावे
🥕चमचमीत चविष्ट लोणचे त्वरित खायला तयार 😊😋
हे लोणचे टिकावू नसल्याने दोन चार दिवसात फडशा पाडावा 😃
अशाच प्रकारे फ्लॉवर गाजर मटार लोणचे पण करता येते