बच्चू ..
ती “बच्चू म्हणते त्याला ..
लहान आहे ना तो खूप तिच्या पेक्षा ..म्हणून ..!!
आणी “समज ..पण खूप कमी आहे त्याला .असे तीला वाट्ते
तीला तो तसा खूप उशिरा भेटला ..
रोज थोड्या गप्पा करता करता ..
तो जवळीकीचा कधी झाला हे तिलाच नाही समजले
तो खूप मोठ्या पोस्ट वर काम करीत आहे असे बोलण्या तुन समजले तीला
त्यामुळे खूप बिझी असतो ..सोशल नेटवर्किंग कडे लक्ष द्यायला फार वेळ नाही मिळत
असे तो ..म्हणे ..पण
ती भेटल्या पासून त्याला रोज तीच्याशी बोलायचे असे
तिची आठवण मनात सतत असते असेही बोलून दाखवत असे
काही वेळा त्याच्या बोलण्यात खूप ओढ पण असे ..
जसे तीला ही खूप मित्र होते
तसे त्याला पण होत्या खूप मैत्रिणी
आणी अशा साऱ्या पसार्यातून त्याने तिचीच का निवड केली असावी
अशा प्रकारचे प्रश्न नेहेमी तीला पडत असत
काय आहे हे नाते ..
असेही ती त्याला विचारे कधी कधी ..
पण तो मोकळे पणाने कधी बोलत नसे
इतकेच म्हणे ..
काही नाती नाही बांधता येत शब्दात ..
असेच आहे हे पण नाते .
ती म्हणे ..मी तुझ्या विषयी विचार करते तेव्हा नवल वाट्ते
इतक्या छान छान ..तुझ्या मैत्रिणी ..
तु त्यांच्या पेक्षा खूप जास्त सुंदर आहेस ...त्
याचे म्हणणे .!
ती नेहेमी म्हणे मी तुझ्या विषयी विचार करते तेव्हा ..थोडे आश्चर्य पण वाट्ते
असा कसा काय माझ्याकडे आकृष्ट झालास..
आणि या आपल्या नात्याचे पुढे काय होणार?
तो म्हणे
मी असा काही विचार नाही करत .
भविष्याचा तर अजिबात नाही
मी.फक्त वर्तमानात जगतो ..
ती खरे म्हणजे अगदी “शब्द प्रभू ..
पण अशा वेळी तीचे शब्द तिलाच साथ देत नसत
भविष्यात कोणालाच डोकावता येत नाही
पण एक अनामिक आणी तरल असे नाते माझ्या डोळ्यासमोर फुलते आहे
हे मात्र नक्की !!❤