🍃तोंडली फ्राय
🍃तोंडली एक वेलीफळ आहे
रोज तोंडली खाल्ल्याने एसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तोंडली अत्यंत महत्वाची मानली जातात. तोंडली खाल्ल्याने भूकेवर नियंत्रण येण्यास मदत होते.
🍃तोंडल्यामध्ये कॅलरी कमी असतात. खूप वेळ पर्यंत पोट भरल्यासारखे वाटते. ताप, घशाच्या समस्यांवरील इलाजावर औषधाचे काम देखील तोंडली करते. नियमित तोंडली खाल्ल्याने सर्दी आणि ताप वारंवार येण्यावर नियंत्रण आणले जाऊ शकते.
यामध्ये चरबी अजिबात नसते आणि सोडियमचे प्रमाणही कमी असते. तोंडली नियमितपणे खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित होतो.
असे गुगल सांगते 😊😊
🍃तोंडली कधी रसभाजी कधी काचऱ्या स्वरूपात केली जाते
ही भाजी फार चवीष्ट लागते
🍃साहित्य
पाव किलो तोंडली
फोडणीचे साहित्य
मोहरी हिंग, हळद, तिखट, साखर, गरम मसाला
मीठ चवीनुसार
कोथिंबीर खोबरे
🍃कृती
तोंडली स्वच्छ धुवून पुसून
शेंडा बुडखा काढून त्याच्या उभ्या चकत्या कराव्या
या चकत्या फार पातळ अथवा फार जाड नसाव्या
पसरट पॅन मध्ये थोडे जास्त तेल घालून
मोहरी हिंग फोडणी करावी
व तोंडल्याच्या फोडी घालाव्यात
🍃गॅसची आच थोडी वाढवून
या फोडी सतत परतत राहावे
झाकण अजिबात ठेवायचे नाही
दहा मिनीटात तोंडली छान कुरकुरीत होतात
कच्ची वाटली तर दोन चार पाण्याचे हबके मारून परत परतत रहावे
🍃तोंडली शिजली की हळद तिखट आवडीचा मसाला व चमचाभर साखर आणि मीठ घालून चांगली मिसळून घ्यावी
वरती आवडीनुसार खोबरे कोथींबीर घालावी
🍃ही थोडी कुरकुरीत भाजी नुसती खायला सुद्धा छान लागते 😋