🍂मिश्र डाळींचे कटलेट
🍂कटलेट आपण नेहेमीच करतों
भाज्यांचे, डाळीचे
त्यात बाईंडींग साठी बटाटा वापरतो
इथे मी बटाटट्या ऐवजी नाचणी पीठ वापरले आहे
🍂साहित्य
उडीद डाळ अर्धी वाटी
एक वाटी हरभरा डाळ
अर्धी वाटी मूग डाळ
अर्धी वाटी मसूर डाळ
एक वाटी नाचणी पीठ
काळे तीळ
पांढरे तीळ
बडीशेप
ओवा
तिखट
मीठ
गरम मसाला
कोथींबीर चिरलेली
लिंबू
बडिशेप
थोडी कसुरी मेथी
🍂कृती
सर्व डाळी रात्री भिजवून ठेवल्या व सकाळी एकत्रच जरा भरड वाटून घेतल्या
त्यात तिखट, हळद, गरम मसाला, बडिशेप, ओवा ,काळे तीळ, पांढरे तीळ , गरम मसाला ,कोथिंबीर हे सारे मिसळून
लिंबू पिळले
एक वाटी नाचणी पीठ
चवीनुसार मीठ घालून
चांगले मळून घेउन
आवडीचा आकार देऊन
गॅस वर कढईत तेल घालून आधी कडक तापवले
नंतर आच मंद करून
खरपुस तळून घेतले
सोबत टोमॅटो 🍅सॉस