*बैलांच्या खुराने शेती केली की घरात खोऱ्याने समृद्धी येते* असं मानणारा शेतकरी बांधव आणि सगळ्यांनी साथ सोडली तरी *वाळलेला कडबा गोड मानुन मालकाच्या सोबत स्वतःही शेतात राबणारे बैल*, यांच्यातील नात्याला खरंच तोड नाही!!
*कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही,*
हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा व शेतकऱ्याचा *बळीवंशीयांचा* आवडता सण म्हणजे "पोळा" वर्षभर खांद्याला खांदा लावुन आपल्या मालकासोबत शेतीत घामाच्या धारा लावुन सोनं पिकविणाऱ्या माझ्या सर्जा राजाचा आज आपल्या मालकाच्या हाताने लाड करण्याचा हा दिवस!!
सर्व बळीवंशीयांना *बैलपोळ्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!*
इडा पीडा टळू दे, बळीच राज्य येवु दे...!!!