एकतर्फी प्रेम!
कधीपासून तुझ्या फक्त
आठवणीतच रमत होते,
आडोश्याला तुझ्या राहून
चोरूनच पाहत होते
प्रेमात कशाचं बंधन नसतं रे
प्रेम हेच तर एक बंधन असतं,
प्रेम हे कुणाला विचारून किंवा
विचार करून होत नसतं रे
प्रेम हे अगदी निखळ असतं
दोन मनांचं ते आत्ममिलन असतं,
प्रेमात नसतो कोणता पक्षपात
प्रेम करायचं असतं अतोनात
एखाद्याचं वय, वर्ण, जात, धर्म
पाहून प्रेम करायचं नसतं रे,
प्रेम हे मनापासून करायचं असतं
मला तुझी प्रतिष्ठा नको होती रे
मला फक्त तुझं प्रेम हवं होतं,
पण तुला हे कधीच नाही कळलं
समाजापासून वेगळं तुझं मन नाही वळलं
मनातल्या या सुप्त भावना
ओठांवर कधी आणु शकले नाही,
तू एकटा असतानाही मी
प्रेमाचा होकार घेऊ शकले नाही....
©️®️ अबोली डोंगरे.