Marathi Quote in Poem by Jiya Kadam

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

दिव्य भावना दिव्यांग

पसरला आहे घोर अंधकार,
घायल झाले आहे मी इथे ठार,
ठरवले मी नाही पुन्हा घाबरणार,
नाही ऐकू, बोलू, बघू, शकत जीवनाचे सार

चिडवतात मला सगळे,
कारण आहोत आम्ही वेगळे,
सगळे बोलतात आम्हाला व्यंग,
पण स्वतःला आम्ही बोलवतो दिव्यांग.

वेगळी मी, आहे अभिमान
स्वावलंबी पणे जीवन जगते स्वाभिमानाने,
खेळणार आम्ही सुद्धा असून अपंग,
कारण नाही आम्ही अपंग पण दिव्यांग.

मागासलेले विचार करणारा व्यंग,
शारीरिक पाने असणारा दिव्यांग.
लडखडत- लडखडत चालते मी,
पण नाही थांबत आहे मी.

जग थांबले मी नाही,
होऊ दे मला काहीही,
पुढे पाऊल टाकत राहणार मी तरीही,
प्रेमाने राहणार सर्वांशी मोठा वैरी असेल तरीही...........

घोर अंधकरात आहे उमेद आशाची,
नाही विजणार जोराच्या पाणीच्या बहाव्यात,
कितीही सुटला जोराचा वारा,
नाही विजू देणार नावातून पोहताना,

दिवा माझा जळत राहणार सतत,
नाही विजू देणार तुला परत,
प्रतीक आहे सहसाचा, विरतेचा,
आमच्या स्वाभिमानाचा, स्वातंत्र्याचा.

जर विजला हा आशाचा दिवा,
तर मिटेल माझी आकांक्षा,
असं नाही की डोळे नाही म्हणून नाही अश्रू,
किंमत त्याची मोठी प्रमाणे कसं ठेऊ डोळ्यात साचून.........

हलून गेले मी, खचून गेले मी,
नाही समजत आहे भावना मनातील,
बोलणे तुमचे ठोकते उरीत खिळ,
लक्ष नाही तुमच्याकडे, देते लक्ष धैऱ्याकडे मी........


नाही समजत कोणाच्या भावना,
नाही समजत कोणाच्या वेदना..........

Marathi Poem by Jiya Kadam : 111925966
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now