एकटी
एकटीच जात होती ती
अंधाऱ्या वाटेने अनवाणी
नव्हतं एकही चिटपाखरू
वा नव्हता एकही प्राणी
रातकिड्यांची अखंड
सुरू होती किरकिर
वाळलेल्या पानांची
वाऱ्याने होई भिरभिर
वाजू लागे अचानक
तिच्यामागे पाऊल
क्षणभर थांबून घेई
ती कसलीशी चाहूल
रपकन झाडावरून
पडला हिरवागार सरडा
थाप पडली खांद्यावर
हात काळा करडा
मान वळवून बघताच
जागीच ती थिजली
खडबडून झाली जागी
अन उशी घामाने भिजली
,#####################