लोक रिएक्ट होतात. लोकांनी रिएक्ट होणं चुकीचं म्हणणारे मोजके मग त्यावर आपण कसे सुजाण आहोत ते प्रदर्शित करतात पण लोक का बरं एवढ्या कळकळीने रिएक्ट होतात तर ज्या व्यक्तीने त्यांच्या मनावर राज्य केलेलं असतं, त्याचा विदारक शेवट झाला वाचून लोक हळहळतात, सामान्य प्रश्न व्यक्त करतात. हाकेच्या अंतरावर सोडा फोनच्या अंतरावर आपण असताना संवाद का कमी होत चाललाय, असतील वादविवाद, मतभेद पण ते कितवर कुरवाळले जाताहेत..लोक विचारणारच,चर्चा होणार, विरून जाणार ..पुन्हा जैसे थे.