सत्य-असत्य
एका हातानं बीज लावलं
त्यानं पहिलटकरीन मातीची
तश्शीच काळजी घेतली.
अंश रुजला...अंकुर फुटला.
दोन्ही हात जोडून मग
उमललं एकेक पान...
तो आनंद त्याने
जगाबरोबर वाटला.
तो इवलासा जीवही
तेव्हा आधारवड वाटला.
एकएक फूटली फांदी
नव्या विचारांची तीच नांदी.
आता काळजी घेणारे
झाले दोन हात. ..
तग धरला झाडानं
उन्हातान्हावर करुन मात.
दोनाचे झाले अनेक हात..
कुणी माया लावली..
कुणी झाडला मानले गुरु..
झाडानं आम्हाला जगणं शिकवलं
जो तो लागला मग प्रचार करु.
झाड विस्तारलं...
झाल्या अनेक शाखा..
अन अचानक गुदरला झाडावर
एक प्रसंग बाका...
जोपासल्या हातांनी घेतला
दुसऱ्या बागेकडे धावा..
"झाड आमचंच आहे "
केला की हो दावा..
शहारलं वयस्क झाड
म्हटले वाटसरुंना विचारा
"आम्ही वाटसरुंना मोजत नाही..
तुम्ही हट्ट आता सोडा..."
जरी होतं जुन्यातलं
त्याला सत्याची होती चाड..
असत्यावर विजय मिळवायला
आता झगडत राहील झाड..
आता झगडत राहील झाड. .
© संजय स गुरव (सदासन)