माझे बाबा ✍️
आज माझे बाबा आठवले
त्यांनी म्हटल असत माझ्या,
लेकीने माझे नाव उंचावले...
खर सांगा मित्रांनो,
यापेक्षा मोठे मी काय कमावले....
पैसा नव्हता खिशात,
पण कोणाचे उसणे घेऊन नाही शिकवले,
आत्मनिर्भर होता माझा बाप ,
माझ्यासाठी जोडे ही झिजवले...
म्हणायचे खूप मोठी हो,
म्हणून डोक्यावर हात ठेवले...
खर सांगा मित्रांनो यापेक्षा मोठे मी काय कमावले...
माझ्या यशाचे चित्र त्यांनी डोळयात आपल्या सजवले,
मी यशस्वी होण्याआधीच त्यांनी आपले डोळे ही मिटवले.....
आणि मी तेव्हा माझ्या बाबाला कायमचे हरवले...
आठवले तर डोळ्यातील अश्रू ही खाली पडतात...
पण मन मात्र बाबा आहे म्हणून त्यांना च शोधतात . ..
भाकरी देऊन मला ते उपाशी पोटी निजले....
गरीबी होती मोलाची तिनेच आम्हाला शिकवले....
नशीब माझे नाव त्याच्या नावापुढे लागले...
खर सांगा मित्रांनो यापेक्षा मोठे मी काय कमावले...
वैशाली ग. कदम.....