Marathi Quote in Poem by prajakta panari

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

निसर्गातली निस्वार्थता
प्रेमात तुझ्या दिसते
माय तुझ्यामुळेच मजला
प्रेम अपार मिळते

जखमा होत तेव्हा
तु मलम लावशी मायेने
त्या मायेच्या स्पर्शातूनी
जखमाही डोलत सुखाने
मनास होत्या वेदनाही
विरत तुझ्याच कुशीतून
सांग ना तुझ्या मायेला
देण्याइतके काय जगी मोठे

जीवनात आल्या वादळाला
सावरती तुझेच शब्द
कोलमडल्या माझ्या मनाला
उठवते तुझेच प्रेम
सांग ना अशा तुझ्या प्रेमाइतके
काय जगी या मोठे

वेळेची अनमोल ठेवही
आमच्यासाठी तू वेचसी
तुझ्या वाट्याचे सुख सारे
आम्हावरीच तू खर्च करसी
हजारो आमच्या चुकाही
पोटी घालसी आभाळ बनूनी
म्हणूनी वाटते मजला रोज
आभाळ भरले तुझ्याच हृदयी

तुझ्या वाढत्या गरजांना
रोखसी निर्धाराने तू
सांग ना माय किती त्याग तू
आमच्यासाठी करत राहसी
जीवनातले सारे क्षण तू
आमच्या जीवनासाठी देसी
तुझे जगणे सारे तू
आम्हालाच अर्पण करसी
अशा या तुझ्या जगण्याला
कशी साठवू माझ्या मनात
मनही पडते माझे छोटे
तुझ्या ऋणांपुढे

Marathi Poem by prajakta panari : 111804288
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now