भुरळ पाडणारे, वरवर सुंदर दिसणारे असंख्य क्षण आयुष्यात येतात, त्यांची चमक पाहून आपण थोड्यावेळासाठी त्या मृगजळात अडकतो, गुरफटत जातो आणि मग कळतं, चांदीवर सोन्याचं आवरण घेऊन आलेले ते क्षण किती फसवे होते..अश्या फसवेगीरीत आपण कधी बळी पडतो, जेंव्हा आपण मनाने कमजोर झालेले असतो,किंवा भावनिक दृष्टीने परिपक्व नसतो..आणि तोच एक क्षण आपला घात होण्यासाठी पुरेसा असतो...त्यामुळे कोणी सोन्याची चमक उधार घेतलीये आणि कोण अस्सल सोनं आहे हे ओळखायचं असेल तर त्यासाठी पुरेसा वेळ द्यावाच लागतो...
अनु...🍁🍁