Marathi Quote in Book-Review by sadhana

Book-Review quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

ममस्पर्शाचा अर्थ
मनुष्याला जीवनात अनेक घडामोडींची सांगड घालावी लागते,अनेक सुखदुःखाशी झगडावे लागते,अनेक प्रतिकूल प्रसंगांना सामोरे जावे लागते आणि असेच सामोरे जाता जाता त्याला अनेक सुख दुःखाच्या स्पर्शाची जाणीव होत असते,प्रेमाची मायेची ओळख पटू लागते,अशीच मला ओळख पटली एका स्पर्शाची! ममस्पर्शाची म्हणजे जेव्हा मी स्वतः आई झाले तेव्हा.लग्नानन्तर पहिल्याच प्रसूतीच्या वेळी सुंदर बाळ झालं,आणि त्याच इवलेवलस अंग,हात पाय पाहून डोळे भरून आले.गरोदर असतानाच त्रास ,भीती त्या बाळाला पाहताक्षणीच जमीनदोस्त झाली. आणि एका नव्या स्पर्शाची,नव्या नात्याची जवळून ओळख पटू लागली.
प्रसुंतीनंतर सव्वा महिना घराबाहेर जाता येत नव्हते, मग काय पिल्लू ,मी आणि कोणी भेटायला येणारे नातलग एवढंच माझं जग.नातलग भेटून गेल्यावर आई मला आराम करण्यास सांगे, तेव्हा बाळाला जवळ घेऊन झोपायचे त्याला जवळ घेतले,कि मला वाटे, त्याने त्याचे छोटे से हात माझ्या गालावरून फिरवावे,मी सारखी त्याचा हात हातात घेऊन माझ्या गालावरून फिरवायचे.पण त्यावेळी त्याला काही कळतच नव्हतं.पण पिल्लू माझ्याकडे येताक्षणीच शांत बसे,हे पाहून मला खूप हायसे वाटायचं आणि माझ्या आईकडे पाहून समजायचं कि मला माझी आई का सारखी पाहिजे असते ते ! जसजसा पिल्लू मोठा होत गेला ,तसतसा तो रांगायला ,उभा रहायला ,चालायला शिकला.बोलता पोपट झाला, घरात नुसती बाराखडी सुरु झाली,आणि माझ्या मनात मात्र त्या ममस्पर्शाची जाणीव आणखी दृढ होत चालली होती,पिल्लूला माझ्याजवळ झोपायला फार आवडायचं,झोपताना मात्र तो माझा चेहरा घट्ट धरायचा.कुरवाळायचा मला तो क्षण असाच थांबवावासा वाटायचं.आणि माझ्या डोळ्यातून ते सुखाश्रु गळू लागायचे.आणि मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी एक जाणीव होऊन जायची ती ममस्पर्शाची!

Marathi Book-Review by sadhana : 111698102
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now