कोजागिरीची औरच आहे बात
चांदणे उधळीत सरेल ही रात
कुणी भाग्यवंत उभा चांदण्यात
घेऊन प्रियसखीचा हातामधे हात
कुणी वैद्यराज गर्क असे विचारात
चांदण्यात चढवेल भावना औषधीत (प्रवाळपिष्टी)
कुणी दूर मंदिरात घंटानाद करीत
रमलेला देवीच्या पूजन अर्चनेत
कुणी रमलेले हास्यविनोदात
केशरी दुधाच्या मधुर आस्वादात
मी येथे जागी अजूनी चांदणे शोधीत
भिजेल का पूर्णचंद्र माझ्याही कवितेत?