वळणावरील वळण..
वळणा-वळणाने घेतलेले वळण
सरळ मार्गापेक्षा अवघड ठरते पण ,
वळणावळणावर जी विलक्षण
अनुभुती येते,
त्याची व्यापकता अलौकिक असते...
वळणाने वळण लागते पण,
वळणाआधीचा माज माञ
जबाबदारीनेच संपतो.....
उनाड बालपणातील अवखळ पिटारा..
शिस्तीच्या आवर्तनाने प्रभावी होतो..
त्यातील जिद्द , तळमळ उधळली जाते..
पुढे........
तंद्री सावरायला पारिजातकाच्या
नाजुक वळणावर हळवी चाहुल
पुरेशी असते....
भरजरी , दिखाऊ अशा फिरंगी
रातकिड्यांचा तो मार्ग ....
चौकातील वळणावरच्या टप्पोरी
गल्लीत संपतो....
नेसलेलं डोरलं , जगण्यातल्या
शाश्वतीतला नवखेपणा,
अनुभुतीच्या वळणावरचं दार ठोठावत
भांभावल्यागत वावरु लागतं.....
इथल्या प्रत्येक वळणावर भिरभिरणारं
मनपाखरु गुफ्तगु करत व्यापक
सुखाचा शोध घेऊ लागतं....
जीव टांगणीला लावुन खेळलेला खेळ
माञ आयुष्याचा डोंबारी बनवुन जातो..
हजारो मार्गाचे वळण समोर 'आss'
वासुन उभे असते.....
त्यातील योग्य-अयोग्य या भ्रमात
धावपळीचे भुत मानगुटीवर बसुन असते
निर्णयाचा निकाल काही असो....
पण खरं तर हेच नं....
वळणावळणाने घेतलेले वळण
सरळ मार्गापेक्षा अवघड ठरते पण
वळणावळणावर जी विलक्षण
अनुभुती येते,
त्याची व्यापकता अलौकिक असते ...
वळणाने वळण लागते पण
वळणाआधीचा माज माञ
जबाबदारीने संपतो......
✒@shwini_kasar