उगवल्या सांजेला
पाकोळ्यांची दिशा
तिच्या निरव शांततेला
चांदण्यांची नशा
रातकिड्यांच्या सुरात
कसा भिनलाय बघ वारा
सांग सये कसा सावरु मी
तुझा मनकवडी तोरा.....
धुंद तुझ्या पिरतीची
जणु काजव्यांची पाचवे
कावर्या नयनी नवी
बावरी आसवे...
काजळाच्या धुक्यामंधी
मनाला या घोर
सांग सख्या कशी सावरू मी
तुझी लहरी ओढ.....
@ashwinikasar