Marathi Quote in Poem by Smile

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

कुणीतरी सोबत सोडली म्हणून
वेळ थांबत नाही
एका नकारानं काही सारं
जग नक्कीच संपत नाही

आत्महत्या हे उत्तर नाही
तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं
खेळ नको रे मांडू असा
आयुष्य आहे तुझं मोलाचं

इतकाच कंटाळा असेल जगण्याचा
तर फक्त एकदाच सीमेवर जा...
आयुष्याचं महत्त्व वेड्या
जवानाला त्या विचारून पहा...

जिद्द ठेव रे मनामध्ये तू
नियतीचा हा सारा खेळ
असेल सारे मनामध्ये जे
एक दिवस ते नक्की मिळेल

उंच उंच ती झेप घ्यायला
ज्याचं त्याचं वेगळं आकाश
अंधाराची रात्र काजळी
उजळून देईल लख्ख प्रकाश

#हिम्मत

Marathi Poem by Smile : 111506510
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now