आसोनी हात पाय
जाहलो म्या पांगळा
गावच्या वेशीचे कवाडे
लावूनी गाव झाला आंधळा
आज व्हावी रे विठ्ठला
तुझीच एक गळा भेट
लोटांगण घालाया रे
पायी तुझ्या आज थेट
दिंडीची वाट ओस पडली तरी
सुटत नाही बघ तुझा लळा
गळ्यांत तुळशीची माळ नाम तुझे ओठावरी
एकादशी कोरड पडली तुझ्या नामाची ह्या गळा
...अविनाश लष्करे
( ARL )