बाप कुठं असतो..?
सगळीकडे आईच असते! बाप कुठेचं नसतो...
प्रत्येक गोष्टीचं कारण नसला तरी
निमित्त मात्र तोच असतो..!
मुलीच्या इच्छा समजून घ्यायला बाप कुठेचं नसतो,
पण मुलीच्या सुखासाठी दार दार फिरतो
तो बापचं तर असतो..!
पोरां-बाळाचं बापासोबत खटकतचं असतं..
पण आधार म्हटलं की जिभेवर मात्र
बापचं नाव येत असतं..!
कधी कधी बाप होऊनच जातो
परिस्थितीशी हतबल, हताश..
कितीही चिडला, कितीही रागावला तरी,
बापचं असतो घरावरचं आकाश..!
बाप हाच पडद्यामागचा खरा नायक असतो...
पडदा पडला तरी त्याचा
शो मस्ट बी गो अॉन असतो..!
शेवटी फक्त एवढचं म्हणेल..,
बापासाठी कोणता एक दिवस नसतो..
आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस
हा फक्त बापामुळेच असतो..!
-सिद्धी चोपडे