भाकरी
मन सुन्न करणारी घटना आज औरंगाबादमध्ये घडली,बातमी ऐकून मन स्तब्ध झाले.पायी प्रवास करत जाणारे काही परप्रांतीय मजूर रेल्वे रूळावर झोपले होते आणि मालगाडी ने त्या १६ जणांना एका क्षणात उडवल.काय म्हणाल असेल त्यांचं मन त्या क्षणी?अगदी छिन्न विच्छिन्न करणारी ही घटना.
भाकरी साठी १७०० किलोमीटर आपल गाव सोडून आलेले हे मजूर होते,आपल्या राज्यात जाण्यासाठी सोबत शिदोरी म्हणून यांनी भाकरी ठेवली होती,आज त्यांचे मृतदेह रेल्वे रुळावर पडलेत,आणि त्यांचा बाजूला १०-१२ भाकरीचा ढिगारा!आता भाकरी तर आहे पण तिला खायला माणूस नाहीये😰याच भाकरी साठी प्रयेक जण अहोरात्र मेहनत घेत असतो परंतु तिला न खाताच मरतो.जास्त साचवून ठेवू नका, त्या त्या क्षणी त्या त्या गोष्टींचा आनंद घ्या,कोण जाणे उद्या त्या मजुरांच्या जागी आपण असू! पूर्ण जगावर राज्य करणारा सिकंदर सुद्धा दोन्ही हात रिकामे ठेवून च गेला हो!अस म्हणतात माणूस जन्म मिळायला खूप पुण्य करावं लागत,आता मिळाला आहे तर त्याचा आनंद घ्या,जमेल तेवढं गरिबांना मदत करा,जास्त साचवून ठेवला तर त्याचा नाश अटळ आहे हे नक्की!
ती स्वप्नातील भाकरी पुन्हा आर्धीच राहिली
भूक पोटातील मी माझ्या आवंढ्यात गिळली!!!
पटत असेल तर विचार नक्की करा!!
- सायली