#वर
लग्नाच्या बाजारात
थाट खूपच वराचा
नटून थटून उभा जणू
व्यवहार जनावराचा
नोकरी पगार जाहिरात
लावा म्हणतात बोली
हुंडा ना ही वरदक्षिणा
घेतोय वर हाती झोळी
ठेवा रे लाज आता
जनाची ना तर मनाची
सोडा लोभ करा आदर
ही पवित्र गाठ लग्नाची
@प्रल्हाद दुधाळ.

Marathi Poem by Pralhad K Dudhal : 111425457

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now