दुष्काळ! हा शब्द ऐकला तरी, अंगावर काटा येतो.
दुष्काळ! हा कसाही आणि कसलाही असू शकतो. शेतकरी राजा ओला किंवा सुका पडणार्या दुष्काळाच्या विवंचनेत...लेखक किंवा कवी चांगल्या लिखाणाच्या, विचारांच्या दुष्काळाच्या विवंचनेत... गरीब, भिकारी पैशांच्या दुष्काळाच्या विवंचनेत...राजकारणी नेते मतांच्या दुष्काळाच्या विवंचनेत... जेष्ठ नागरिक आणि आप्त कुटूंबिय प्रेमाच्या दुष्काळाच्या विवंचनेत... चांगले शिक्षक,शाळा कॉलेजेस चांगल्या विद्यार्थ्यांच्या दुष्काळाच्या विवंचनेत..!
एकूण काय तर, सगळीकडे दुष्काळाच दुष्काळ व्यापून राहिलाय.
तो... नैसर्गिक, प्रेमाचा,पैशाचा,विचारांचा,अगदी लोकांचा कसा असेल!
#दुष्काळ