प्रियांश...
नर्सरी मधून जेव्हा आपण एखादं रोपटं #मूल्य देऊन घरी आणतो तेव्हा त्या रोपट्याला वाढण्यासाठी, फुल उमलून सुगंध दरवळण्याकरता खूप मेहनत घेतो! रोज पाणी देणं, खत देणं, सूर्यप्रकाश नीट येतो आहे की नाही हे तपासतो, कीड लागू नये म्हणून वेळीच औषध फवारणी करतो मग सहा सात महिन्यांनी त्या रोपट्याचे बहारदार झाड बनतं! मग सुंदर फुल लागतात अन संपूर्ण अंगण बहरून जातं! एक रोपटं एवढा वेळ घेत ऍडजस्ट होण्यास मग दुसऱ्याच्या घरून बायको म्हणून घेऊन आलेल्या मुलीला का वेगळं मानलं जातं?
एक स्त्री म्हणून ती आईच्या पोटातून सगळं काही शिकून आल्यासारख्या अपेक्षा तिच्याकडून केल्या जातात हे कितपत योग्य आहे? जर तिच्या माहेरी लिंगभेद न करता भावासोबत जर का ती मोठी झाली असेल तर, भेदभाव करणाऱ्या संकुचित लोकांनी तिला दूषणे अथवा वाईट बोलण्यापेक्षा स्वतःला प्रश्न विचारावा ते त्यांच्या पुढील जनरेशनला हेच देऊन जाणार आहेत का?
संकुचित घरातून जेव्हा एखादी मुलगी स्वतंत्र कुटुंबात येते तेव्हा सुरुवातीला तिला ते पचायला जड जात पण, अत्यंत आतल्या गाठीतल्या मनुष्याप्रमाणे या देखील आपल्या सोयीने परंपरा अन बुरसटलेले विचार कुरवाळून दुसऱ्या स्त्रिला दूषणे लावायच्या थांबत नाहीत. कारण, त्यांची संकुचित मानसिकता जी त्यांना जन्मापासून मिळालेली असते, त्यात ठासून ठासून सांगितलेलं असतं, दुसऱ्या स्त्रिचा द्वेष कसा करायचा! सासूने सुनेचा, सुनेने सासू सासऱ्यांचा, वहिनीने नणंदेचा...ही कुत्सित मानसिकता कधी बदलणार?
ज्याप्रकारे प्रत्येक नवरा नावाचा प्राणी, मरमर मरतो, अगदी त्याचप्रमाणे बायको नावाचा हा देखील एक सजीव प्राणीच आहे. तिला देखील तुम्हा पुरुषांसारखे मन आहे, ती सुद्धा तुमच्यासारखीच दिवसभर काम करत असते. हजार टेन्शन तिला सुद्धा असतात, तोंड मारून बुक्यांचा मार खाऊन तरीही रात्री याच्या आवडीचं काय बनवू? अगदी बिचारी रात्री झोपताना सुद्धा दुसऱ्या दिवशी याला काय आवडेल ब्रेकफास्ट मध्ये या विचारात झोपी जाते! तरीही जर का तुमच्याकडे घरी आल्यावर तिच्यासोबत वेळ घालवण्यापेक्षा मोबाईल सोबतच राहायचे असते, तेव्हा एकदा विचार करा, पूर्ण दिवस ती तुमच्या चेहऱ्यावरच समाधानाचं हसू पाहण्यासाठी पाळलेल्या कुत्र्यासारखी मागून मागून फिरत राहते ती तुमच्या एका प्रेमळ मिठीसाठी! लग्नात सुख नाही हे बोलणं खूपच सोपं आहे पण, नशिबाने स्वतः पेक्षा तुमच्यावर प्रेम करणारा पार्टनर मिळणं हे खूप अवघड आहे! निरपेक्ष प्रेमासारखा अनमोल ठेवा ज्याच्या पदराला तो माणूस साक्षात इंद्रापेक्षाही श्रीमंत! पण, माणूस नावाचा प्राणी हा ठेवा हरवून बसल्यावर त्याची आठवण करून कुढत आयुष्य घालवेल!
टाळी कधीच एका हाताने वाजत नाही म्हणून सुखी होण्याचा मूलमंत्र म्हणजे शॉर्टटर्म मेमरी लॉस! नव्या पिढीसोबत नव्या रंगात रंगण! बुरसटलेल्या विचारांना तिलांजली देऊन! आपल्या पार्टनरला वेळ आणि किंमत देऊन! आणि सगळ्यात महत्वाचे लग्न नावाच्या प्रोसेस मध्ये स्वतःवर प्रेम करायला विसरलेल्या सर्वांना - सेल्फ लव गाईज! स्वतःच्या पुन्हा प्रेमात पडा, स्वतःला पुन्हा वेळ द्या! स्वतःचे #मूल्य जाणा!
#प्रियासातपुते #मूल्य