Marathi Quote in Motivational by Gaurav Lokhande

Motivational quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#तिचाप्रवास

       आज परत आजी ला भेटावस वाटल, तिच्याशी बोलवस वाटल ,तिच्याकडून पान  विकत घ्यावेसे वाटले . मग मी माझ्या मिञाला घेऊन गाडगे नगर ला मंदिराजवळ गेलो , दिवसभर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आजी तिथेच उन्हात बसलेली होती ..
     
   मी क्षणाचाही विलंब न करता आजी जवळ बसलो आणि, आणि बोलण्याच  निमित्त म्हणुन आधि पान विकत घेतले  , आणि आजीसोबत बोललो . काल जे काही मी आजीबद्द्ल सांगितले होते . त्यापेक्षा आजी खुपच महान आहे अस मला वाटल . मी गहिरवरुन गेलो
आजीला विचारल्याप्रमाणे ती गाडगे नगर ला कोण्यातरी नातेवाईकांकडे राहते.  राहण्याचा मोबदला म्हणुन आजी या वयातसुद्धा घरातील सर्व काम करुन, पान विकण्यासाठी गाडगे नगर ला येते .
तिला मुलबाळ कोणीही नाही , एक मुलगी होती तीही वारली अस मला आजीने सांगितले .
मी आजीला अनाथ आश्रम मध्ये चलण्यास म्हटले पन आजीने नकार दिला.
      आजी म्हणाली की मला मेहनतच कमानुन खायच आहे , मला या जागेशिवाय कुठेच करमत नाही  आजीची ही गोष्ट मला फार आवडली   आजीचा स्वभाव मला खुप आवडला आहे . आता मी रोज तीची भेट घेतो
    आजीला पन माझा स्वभाव खुप आवडला . तिने खुपसार प्रेम, आशिर्वाद मला दिला .
जुन्या छञिमधुन आजीला उन लागते पन पानाचा  टोपलीला माञ ती सावलीत ठेवते . कारण उन्हाने पान खराब झाले तर कोणी विकत घेत नाही . म्हणुन माझी इच्छा आहे आजीला एक मोठी छञी घेऊन दयावी . जेणेकरुन तीलासुद्धा
      ऊन लागणार नाही .
      शेवटी अशी विनंती आहे की असे आजी आजोबा ईतर कोणी अपंग बांधव जे परिस्थितीवर मात करुन भिक न मागता पोट भरण्यासाठी पैसै  कमावत असतात त्यांना आपन मदत करा .कारण आपल्या दहा रुपयाने कुणाची एक वेळची भुक भागवल्या जाते .

Marathi Motivational by Gaurav Lokhande : 111383776
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now