शेणाचा मातीचा
अनामिक ओढीचा
गंध दरवळे उरी
माझ्या मायेच्या घराचा!
भल्या सकाळच्या पारी
जाग आणे कुणी पक्षी
हलगीच्या नादाने
थरथरे त्याची नक्षी!
सख्या सजणी भेटती
प्रेमभरे वागविती
त्यांच्या सोबतीत
गप्पा रंगताती!
माडावरी देवी
बसली थकून
भकताची हाक
मनी साठवून!
असा रंगला सोहळा
भक्ति संस्कृतीचा
माझं लेकरू कुशीत
नाद ऐके निसर्गाचा!