#ऐका
ती ....
अशाच ऐका वळणावर, अवचित ती भेटली होती।
सप्तरंगी स्वप्ननगरीत, अवखळ ती रंगली होती।
स्वप्नांतील महालाचे इमले, ती उगाच बांधत होती।
परिकथेतील राजकुमारी, ती स्वतःस समजत होती।
क्षणभंगुर स्वप्ने सारी, का उगाच झुलवत होती।
हर्षाने मोहरत स्वप्ने, ती मनात फुलवत होती।
असो कितीही खडतर वाटा, धैर्याने ती काटत होती।
जीवनाचे मधुर गीत, ती आनंदाने गात होती।
तव रहस्य आनंदाचे, ती मनात ठेवून होती।
पाहून मजला एकवार, ती हसली हळूच होती।
ती हळूच हसली होती।