सुटले हे भान,
आज मोकळे हे रान।
तुझ्या मिठीत ग सये,
माझी मिटू दे तहान।
रात सरू नये कधी,
मिठीत स्वर्गसुख।
चांदण्याही लाजतील,
पाहे आपले मिलन।
विसरू दे काळ वेळ,
आता कसले अंतर।
उतरवू एक एक,
शृंगाराचे ग पदर।
वर्षावं चुंबनाचा,
डोळ्यांची अबोल भाषा,
चेहऱ्यावर तुझ्या सये,
समाधानाची ग रेषा।
आज होऊ एकरूप,
उधळू दे सप्तरंग।
पिरतिच्या पावसात,
भिजूदे अंग अंग।
उष्ण श्वासांची संगत,
अन हुंकार घुमू दे।
अतरंगी एकमेकां,
आज सर्व सामावू दे।
#चुंबन