पुन्हा एकदा..
समजलेच नाही मला कधी निसटून गेले ते सोनेरी क्षण,,,
का कसे हे घडले आज ही जाणून घेण्या अधीर माझे मन,,
वाच कधीतरी तू प्रश्न माझ्या डोळ्यातले..
समजतील का कधी अर्थ तुला माझ्या मौनातले..
न बोलता तुझे नजरेने सारे बोलणे..
सांग कधीतरी दिसेल का, तुला माझ्या हासण्या मागचे रडणे.
कसले हे वेड कोणती आस ही,पुन्हा पुन्हा तुझ्या मध्ये का असे हे गुंतणे....
जोडता जोडता आयुष्याला,,,पुन्हा एकवार तुटणे!!!