तुला जवळून पाहताना
सारखं जाणवत होतं
पापणीआड मन
सारखं पाणावत होतं
कसे सरले दिवस
कशा सरल्या रात्री
तरीही मला वाटत होती
कुठेतरी खात्री
नसेल काही बदललेलं
असेल सारं उमजलेलं
पण तरीही कुठेतरी नातं आपलं
थोडं आहे उसवलेलं
कुणी व्हायचं धागा
आणि कुणी धरायची सुई
नात्यातली गंमत अजूनतरी
तुला कळलेलीच नाही