Marathi Quote in Funny by Aaryaa Joshi

Funny quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

खरं तर गाजर 🥕🥕🥕🥕नावाची ती मातकट भाजी मला बिलकुल आवडत नाही. भाजी, कोशिंबीर, पुलाव यात हे भेटलं तरी मला ते भावत नाही!पण दर थंडीत याचा रसरशीतपणा मला मोहून टाकतो आणि सुरू होतो त्याचा आणि माझा मधुर प्रवास!an affair to remember!🥕🥕🥕🥕😊😊😊
सुंदर गाजर समोर आलं की ते खवा आण वगैरे भानगडीत न पडता साक्षात आजीची अलवार माया मनात भरून घ्यावी तशी दुधावरची साय आणि घरचं साजूक तूप हाताशी घ्याव आणि सुरू करावी प्रेमकथा!
तो गाजराचा रसरशीत तजेलदारपणा आता तुपात नाहू लागतो!त्याचाही रंग तुकतुकीत होतो!सायीच्या स्पर्शाने त्याला आलेला अलवारपणा आता आणखीन गंधित होऊ लागतो!मध्ये मध्ये येणारे बुडबुडे म्हणजे जणू काही तिन्ही सांजेच्या सूर्याचे केशरपण माखलेले मोती भासतात!हे सगळं डोळ्यांनी पाहताना मनही भरून येत असतंच!
गाजराचा नकोसा वाटणारा तो मातकट सहवास आता सुखद वाटू लागतो!कढईच्या कडेला तो आता त्याचे ते प्रेम पाझरू लागतो! जितकं प्रेम जास्त तितकी गोडी वाढणार असं म्हणून आपण ते बाजूला साचू लागलेलं प्रेमही पुन्हा सारखं करून त्यात भरून टाकतो... एकजीव एकरस करतो!नंतर माधुरी वाढविण्यासाठी साखर पेरली की कल्पनेने ती जिभेवर रेंगाळू लागते!हळूहळू साखर तूप गाजर साय या सगळ्यांच्या प्रेमाचा गंध दरवळू लागतो!एक नाजूक स्निग्धता त्यावर पाखर घालते!प्रेमच जर इतकं अलवार असेल तर बाकी सुशोभन फक्त रसनेची तृप्ती आणि डोळ्याला आनंद देण्यासाठी!
दर थंडीत हे प्रकरण होतंच! गुलाबी थंडीत याचा थोडासा कोमट आणि सुखद स्पर्श शरीर मनाला तृप्त न करेल तर नवल!
🥕🥕🥕🥕🥕
आर्या

Marathi Funny by Aaryaa Joshi : 111315205
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now