"श्रीसूक्त"
"ऋचा१५"
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् | यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान्विन्देयं पुरुषानहम् ||१५||
अर्थ:- हे जातवेद;- हे अग्ने,त्वम-तू
मे:-माझ्या गृहे-घरी,ताम:-,या त्रिभुवन
प्रसिद्ध अशा आणि अनपगामिनीम:-
माझ्या घरी आल्यावर इतरत्र कुठे न जाणारी, लक्ष्मीम-अशा लक्ष्मीला,आवह म्हणजे बोलाव.ज्या लक्ष्मीच्या निमित्ताने
हिरण्यम-सुवर्ण,प्रभुतम-विपुल,गाव:दूध
देणाऱ्या गायी,दास्य-परिचारिका,अश्वान-
उत्तम गतीशील घोडे आणि पुरुषान-सेवक,हितचिंतक,मित्र वगैरे अहम-मी
विन्देयम-प्राप्त करू शकेन.
हा श्री सुक्तातील शेवटचा मंत्र आहे,हिरण्यवर्णाम"या मंत्राने सुरू झालेल्या श्री सुक्ताचा या मंत्राने उपसंहार केला आहे.उपसंहारात विषयाचे सारांशरूपाने पुन:संकलन विषय दाढर्यासाठी करतात.उप संहारामुळे ग्रंथातील समग्र विषय एकाच
वेळी डोळ्यासमोर उभा राहतो,त्या मुळे
त्याचे स्मरण चिरकाल राहते आणि सततअनुसंधानास या स्मरणाची फार
मदत होते. लक्ष्मीची उपासना जसजशी
अधिक प्रगाढ होईल तसतशी उपासका
मध्ये ही चुंबकीय शक्ती जागृत होइल.
साधनेच्या अमर्याद क्षेत्रात एकदा पदार्पण केले की सिद्धीच्या मधुर फुलांचा नजराणा साक्षात आदिमाता
जगज्जननी भूतधात्री विश्वम्भरा महालक्ष्मी कडून गौरवपूर्वक अर्पिण्यात
येतो आणि साधक कृतार्थ होतो.