English Quote in Poem by Prashant Soni

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in English daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

*पूर्वी*
चार ढग एकत्र आले
की मुसळधार पाऊस पडायचा.
आता आभाळ ढगांनी अंधारले
तरी थेंब निथळत नाही.

*पूर्वी*
विहिरीत नुसता हात टाकला
की हाताला पाणी लागायचं.
आता बुडाशी जाऊन बसलं
तरी ओंजळ भरत नाही.

*पूर्वी*
माणसाच्या खांद्यावर हात ठेवला
की आपुलकीचा झरा वाहायचा
आता ह्रदयात हात घातला
तरी ओल लागत नाही.

*थोडक्यात* :
हे ढग काय ,
ही विहीर काय ,
हा माणूस काय ...
चराचरातून *"ओलावा"*
आटत चाललाय हेच खरं !

*"माती" आणि "नाती"*
*यांतला ओलावा जपुया...*

English Poem by Prashant Soni : 111191274
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now