खेळण्यांसारखे मांडून भातुकली परी
सांग काय ते खेळ होते ना ?
खोट्या आशांचे गुंफलेलले
माझ्याभोवती खोटे कोष होते ना ?
समजले कि समज माझे चुकलेले होते ना?
खरेच मी तुला ओळखते जाणते
हे माझेच वेड्यापरी कयास होते ना?
माझ्या प्रत्येक दुःखाचे औषध तूच होतास ना ?
ना संपणारे प्रश्न माझे असले तरी ऊत्तर मात्र तूच होतास ना ?
जरी मी संपली माझ्यात पण उरले मात्र तुझ्यातच होते ना ?
माझ्या हृदयातल्या स्पंदनात आभास मात्र तुझाच होता ना ?
आता किती बरं मी हे स्वतःला समजावण्यात अर्थ होता ना ?
तुझ्या चुप्पीचा अर्थ मात्र वेगळाच होता ना ?
पण मी अजूनही तुझीच आहे ना ?
हे तुलाही तितकच ठाऊक आहे ना ?
मग हे मौनाचे आगळेवेगळे सोंग कशाला ?
बोल हे मौनाचे आगळेवेगळे सोंग कशाला ना ?
©दिपाली प्रल्हाद