अजुनही आठवते ती ,
तुझी माझी पहीली भेट,
काही क्षणांची का होईना ,
मनाची मनाशी जुळली होती घट्ट गाठ ,
नजरेला तुझ्या नजर दिली होती ,
तेव्हाच कळली होती,
तु दिलेली पापण्यांची साथ ,
नव्यानेच जाणवली होती
स्पंदन माझ्या ह्रदयाची ,
भुरळ होती तुझ्या साथ
दिलेल्या लवलवत्या पापण्यांची ,
आजची भेट जरी होती वर्षांनंतरची ,
ओढ मात्र होती जणु पहील्याच भेटिची,
पहीलीच भेट जणु डोळ्यातल्या त्या कमळांची ,
नजर तुझी सागंत होती ऊघड झाप ती पाकळ्यांची ,
अनोखी भाषा ती प्रितीची ,
जुन्या त्या प्रेमाच्या रितीची ,
आता श्वासांनाही जाणीव झालेली ,
अनाहत त्या मुक्या भावनांची ,
नजर तुझीही हटत नव्हती ,जाण्याची वेळ झाली होती ,
नजरेनचं खुणावलं होत खात्री परत माझ्या येण्याची
.
.
नजरेनचं खुणावलं होत खात्री परत माझ्या येण्याची
©दिपाली प्रल्हाद
#marathikavita #kavita #kavyotsav #kavyotsav2019