Marathi Quote in Poem by Pralhad K Dudhal

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#Kavyostav -2
स्मृती-
वृक्ष तरू लता जेव्हा या यौवनात आल्या !
सुगंधित तुझ्या स्मृती पुन्हा जीवंत झाल्या !
आला वसंत जेव्हा फुलवित सृष्टी
ओघळले निर्झर जेव्हा खळाळत्या कंठी
गीतांच्या त्या ओळी ओठांवर आल्या
सुगंधित तुझ्या स्मृती पुन्हा जीवंत झाल्या !
भटकलो माळावरी जेव्हा खुणेच्या मंदिरी
चिंबवले जेव्हा बेछूट तुफानी धारानी
स्पर्शांच्या त्या बेभान स्मृती अनावर झाल्या
सुगंधित तुझ्या स्मृती पुन्हा जीवंत झाल्या !
भुललो जेव्हा सौंदर्यास त्या ताटव्यांच्या
मती गुंग झाली गुलाबी सुगंधाने त्या
काट्यानी जखमा रक्तबंबाळ त्या केल्या
सुगंधित तुझ्या स्मृती पुन्हा जीवंत झाल्या
..... प्रल्हाद दुधाळ.
9423012020

Marathi Poem by Pralhad K Dudhal : 111161620
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now