एक गाय तिच्या बच्छडयासोबत एका गोठ्यामध्ये सुखाचे दिवस जगत असते.परिवार छोटा तसा त्यांच्या गरजाही मर्यादित होत्या. मोठा गोठा होता जवळच नदी, गोठाही माळावर होता त्यामुळे ती आरामात दिवस काढत होती.नदीपल्याड मालावर खूप वस्ती काही प्रान्यांचीच होती एकटी गाय नदीच्या अलीकडे आपल्या वासरासोबत राहत होती.
एके दिवशी खूप जोराचा पाऊस होतो आणि नदीपल्याड सर्वांचेच घरे उध्वस्त होतात सगळे उघड्यावर येतात मात्र गायीचे घर म्हणजेच गोठा टिकून राहतो.
एक रात्री कुत्रा भिजत भिजत गायीच्या गोठ्यामध्ये आला आणि गायीला विनवू लागला कि हे गोमाता मी तुझ्या गोठ्यात थोडावेळ आश्रय घेऊ का? तुला काहीही त्रास न करता एका कोपऱ्यामध्ये गपचूप पडून राहील.त्या कुत्रावर द्या येऊन गायीने त्याला राहण्यास अनुमती दिली.काही वेळाने तिथे एक साप आसरा मागण्यासाठी आला त्यालाही गायीने द्या येऊन अनुमती दिली.थोड्या वेळाने तेथे विंचू आपला जीव वाचवत थारा मागण्यासाठी गायीच्या गोठ्यात येतो,गाय काही बोलणार तेवढ्यात कुत्रा त्याला राहण्याची अनुमती देतो.कुत्र्याचे असे वागणे बघून गायीला रागच येतो पण शांत स्वभावामुळे ती शांतच राहते.
हळूहळू काही वेळाने तिथे गाढव, डुक्कर खूप सारे एका मागून एक आसरा मागायला येतात. त्यामुळे सगळ्यांना अडचण निर्माण होऊ लागते . तरीही गाय आपल्या बच्छडयासोबत परिस्थितीशी जुळवून शांतच बसते.
त्या रात्री सगळे एकत्र येऊन विचारमात्रा करतात, सगळ्यात जास्त जागा तर गाईला लागते आणि आतातर तिच्याबरोबर तिचं वासरुसुद्धा आहे, तर मग आपण त्या दोघांनाही गोठ्याबाहेर काढलं तर...?आणि ते सार्वजण त्यांच्या विचारधारेवर अमलबजावणी करतात.. सर्वजण मिळून गाईला गोठ्याबाहेर काढतात..
जसजसा जमाना बदलत जात आहे तसतसा प्रत्येक माणसालाही आपल्यामध्ये बदल घडून आणले पाहिजेत नाहीतर गायीसारखी अवस्था होइल
©दिपकरिंगे