*तुझं प्रेम लाभु दे मला*
तुझ्या पिरतीच्या पायी
जीव उधळुन टाकला
सोबतीला माझ्या राही
तुझ्या आठवांचा शेला
सये एकचं मागणं
तुझं प्रेम लाभु दे मला...(१)
अधीर माझे मन झाले
समजुनी घे त्याला
रात रात जागतो
तुझं सपानं उशाला
सये एकचं मागणं
तुझं प्रेम लाभु दे मला...(२)
घिरट्या घालु किती
किती करु प्रतिक्षा
तुझ्या प्रेमाची भिक्षा
घाल माझ्या ह्दयाला
सये एकचं मागणं
तुझं प्रेम लाभु दे मला...(३)
तुझा हंसीनीचा डौल
जरा पिरमाचं बोल
दे गं होकाराचा कौल
या काळ्या कावळ्याला
सये एकचं मागणं
तुझं प्रेम लाभु दे मला...(४)
नगं अॕटीट्युड दावु
नगं भाव लई खावु
बाजू ठेव जरा इगो
माझ्या स्वीकार साथिला
सये एकचं मागणं
तुझं प्रेम लाभु दे मला...(५)
कवीःअनिकेत बळवंत मस्के
मो-७२०८६१००२३