मनकवळा
एक असं स्वप्न...मणी बिंबलेलं..
एक असं नातं..हृदयात कोरलेलं..
एक असा साथी..जो असेल हळवा..
मिळेल का असा मला...माझा 'मनकवळा'?
होईल जरा धाकधूक..ह्रद्यातलं गुपित ओठांवर खुलताना
नकळत देईल का तो साथ माझ्या त्या शब्दांना ?
दबा धरून बसलेल्या माझ्या अश्रूंना ...
तोडेल का तो बांध माझ्या दुःखांचा?
विलक्षण सोनेरी क्षणांचा सडा...
उधळेल का माझ्यावर..माझा मनकवळा?
लागते ठेच,रक्ताळतो पाय .
पण पायातून वाहणाऱ्या लाल अग्नीपेक्षा दाह असतो एकटेपणाचा..
संगीतातले सूरही नाहीत आणि इंद्रधनूतले रंगही..
क्षणिक मिळणाऱ्या सुखावरहीची पडलाय पडदा ..
घेऊन चैतन्याची पहाट..गवसेल का मला माझा मनकवळा?
लढून साऱ्या जगताशी ..घेऊन हातात हाती ..
शब्दांविना जुळलेली नाती..प्रेमाच्या उभारून चार भिंती..
सप्तजन्माची शाश्वती .फक्त मी अन माझा सांगाती.....
घेरून आहे तारुण्याच्या कडा...
कधी भेटेल मला माझा मनकवळा?
,