पात्रता
आपल्याला आयुष्यात काय मिळतं????
ज्या गोष्टींची आपण इच्छा करतो ते ?? नव्हे, तर आपण ज्याला पात्र असतो तेच आपल्याला मिळतं.
म्हणून आपल्या इच्छांची तुलना आपण आपल्या पात्रतेसोबत कसे काय करू शकतो??
इच्छा ह्या प्रत्येक व्यक्तीच्या असतात. पण त्या सगळ्यांचाच पूर्ण होऊ शकत नाही, पण म्हणून इच्छा कधीच पूर्ण होत नाही हे विधान सर्वोतोपरी चुकीचं आहे. इच्छांना जेव्हा सातत्य, दिशापूर्व, आणि आत्मप्रेरणयुक्त मेहनतीची जोड लागते तेव्हा ती इच्छा पुर्णत्वास येते.
मेहनत जेवढी महत्वाची आहे तेवढीच ती दिशापूर्ण असणे हि महत्वाचे आहे. कारण जे करण्याची बिलकुल आवश्यकता नाही अस काम कितीही सातत्य पूर्वक आणि काळजीपूर्वक केलं तरी त्याला काहीच अर्थ उरत नाही.
शिडी च्या टोकावर पोहचल्यावर जर हे लक्षात आलं कि ती शिडीच चुकीच्या भिंतीवर लावली आहे तर त्या कामाला काय अर्थ?
म्हणून वेळ आणि परिश्रम दोहोंचा मध्य साधून व्यवस्थापन करायला हवं. आपल्याला आयुष्याकडून काय हवं आहे आणि कुठे पोहचायचे आहे हे आधी निश्चित असायला हवं.
आपल्याला जे हवं ते मिळत नाही तर आपण ज्याला पात्र असतो तेच आपल्याला मिळतं. हा ईश्वराने बनवलेला सिद्धांत आहे, तो त्याचा कायदा आहे. आपला कायदा असावा सातत्यपूर्व आणि दिशाबद्ध प्रयत्न
आणि एक महत्वाकांक्षा कि या परिश्रमाद्वारे मी सर्वोकृष्ट आणि फक्त सर्वोत्कृष्ट गोष्टी साठीच पात्र बनेन.