खेळ
आयुष्य म्हणजे बुद्धिबळाचा खेळ आहे
आणि तो तुम्ही ' त्याच्याबरोबर' खेळत असता
तुमच्या प्रत्येक चालीनंतर
पुढची चाल तो खेळतो,
तुमच्या खेळीचं नाव आहे 'निवड'
आणि त्याच्या खेळीचं नाव आहे 'परिणाम'
तुम्ही जशी खेळी कराल तस तो मात करेल
तुमची परीक्षा घेतली जाईल.....
तुम्हाला आव्हानं दिली जाईल.....
अगदी
तुमचा कडेलोट व्हायची वेळ तुमच्यावर येईल
पण जर तुम्ही तुमचा खेळ शेवट्पर्यंत चांगला खेळत राहिलात
तर तो जिंकेल
तुम्हाला जिंकण्याची परवानगी देऊन .