सांग ना ,ती सध्या काय करते...!
पहाटे येणारी वाऱ्याची मंद झुळूक रोज विचारते,
सांग ना , ती सध्या काय करते...!
अजुन कुणावर प्रेम करत असेल ती,
कि माझ्याच आठवणीत असेल ती ?
हसमुख चेहरा घेऊन,
मी नाही म्हणून रडत नसेल ना ती...!
विसरु तिला नाही शकत, अजूनही ती मला माझीच दिसते...!
सांग ना, ती सध्या काय करते...!
तिला नसेल वाटत का,
सर्व सोडून माझ्याजवळ यावं...!
राहिलेलं आयुष्य स्वतःचं,
धुंद होऊन माझ्या ताब्यात द्यावं...!
असे वाटते झोपण्यापूर्वी, ती जरूर माझी वाट पाहते...!
सांग ना, ती सध्या काय करते...!
बघावसं वाटतं तिला,
संगणकात ठेवलेल्या फोल्डर मध्ये जाऊन...!
स्पर्श करण्याची होते मग इच्छा,ओठ अलगद गालावर ठेऊन...!
आभास बनून राहतात माझ्या साऱ्या इच्छा, आणि स्वप्नही कुठेतरी हरवून जाते...!
सांग ना, ती सध्या काय करते...!
आता तिला एकच सांगा,
मी तुझं खुप काही चोरून आणलंय...!
इकडे-तिकडे शोधू नकोस म्हणावं,
जेवढ होत तेवढ सार आणलंय...!
बघू, आणलेलं सर्व घेऊन जायला येईल का,
हट्ट करत माझ्यापाशी, मनसोक्त रडेल का...!
सांग ना , ती सध्या काय करते...!