मृगजळ
आयुष्य म्हणजे एक विस्तारलेले रान आहे
ऊन सावली च्या खेळांत लपलेलं सुख दुःखाचे कोड आहे
कधी शीतल कधी उष्ण, कधी सहन न होणाऱ्या झळा
आणि अचानक येणाऱ्या आल्हाददायक कळा
निसर्गाच्या बाहुपाशात बिलगून नात्यांचा गोडवा गात
बीज रोवून प्रीतीचे रंगांना फुलपाखरू देतंय साथ
उघडून डोळे इवले,मृग हि बघतय सृष्टी
झोनझवणारा वारा आणि धावणारे पाय बदलवत आहे त्याची दृष्टी
बागडायला हवं त्यानं आणि आस्वाद घ्यावा जगण्याचा
पण नजर जाते क्षितिजा कडे, आणि ध्यास लागतो जिंकण्याचा
असंख्य धावणारे पाय ,वाट जाते एकच
क्षणभंगुर ते सुख तरी हि ते हवंच
होतो भास मृगजळा चा,बुद्धी होते स्थूल
नाती जातात विरून ,कोमेजून जात नुकतंच उमलले फुल
चूक कि बरोबर यातलं अंतर आता कळत नाही,
कस्तुरी च्या शोधात स्वतः चा च शोध लागत नाही
धावत धावता पाय हि क्षीण झाले
एका आभासमुळे सारे जीवन कवडीमोल झाले.
आता मृत्यू हि समोर येऊन थांबलाय,संगतीला कुणी नाही
अपेक्षा तरी कशी करू? मृगजळा कडे जाताना मी मागे वळून बघितलं च नाही.