#सांज
सुर्यानारायनाने रथ आपला
पुन्हा माघारी हाकला
केशरी गुलाल चौफेर उधळत
परतीचा मार्ग धरला
इवल्या चोचीच गोदाम
चिमूटभर दाण्याने साठला
पक्षी वाट भरकटतील कशी
जीव घरट्यात अडकला
लाटांवरती नाचू लागला
अल्लड सांजेचा अवखळ वारा
खळखळनाऱ्या लाटांचा
किनाऱ्यात जीव सारा....