Marathi Quote in Shayri by Suvidha undirwade

Shayri quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#Kavyotsav
विषय:- भावना

किती ही गुंतागुंत, 

पण मनात भावनांची रास आहे...

वेगळ्या अपुल्या वाटा जरी, 

सोबतीची आस आहे.... 


कितीही मैल दूर असता, 

सलगीचा तरिही भास आहे.... 

कोमेजलेल्या मोगर्यालाही, 

मंद मंद सुवास आहे..... 


शरीर नव्हे हा तर मनाचा, 

जन्मोजन्मीचा प्रवास आहे.... 

नसले हातात हात तरिही, 

प्रेमाचा हा सहवास आहे.... 


ओळखीच्या स्वप्नांची, 

अनोळखी ही वाट आहे.... 

 आशेचा स्पर्शते किनारा, 

अनोळखी ती लाट आहे.... 


तारे-वारे,  चंद्र-चांदणे, 

यांची तुझ्याचसाठी आरास आहे... 

जाणिव तुझ्या असण्याची, 

माझ्या मनाच्या स्पर्शास आहे....


तुझ्या आठवणींचा प्रत्येक क्षण

माझ्यासाठी खास आहे

येणार कधीही नाही तरी

तुझ्याच येण्याचा ध्यास आहे.... 


तुझ्या प्रेमाचा सांग ना

कसा हा हव्यास आहे

तूच माझ्या प्रीतिचा

अखेरीचा श्वास आहे.....


तू भेटावास मज

मनाचा हा अट्टाहास आहे

आयुष्यातील क्षण दूर नाही तो

खुळ्या दिलाचा विश्वास आहे....


रूप निखळ दवबिंदूचे,

लाभले तुझ्या नयनास आहे.... 

मोहक, मनोहर रूप तुझे, 

बघ त्या प्राजक्त सुमनास आहे..... 


सुटेल का कधी गुंता हा, 

जो तुझ्या माझ्या दरम्यान आहे... 

असह्य झालाय विरह आता, 

तुझ्यातच अडकला प्राण आहे......

तुझ्यातच अडकला प्राण आहे......

Marathi Shayri by Suvidha undirwade : 111035038
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now